भजनी मालिका

भजने

संतमहानुभाव येती दिगंबर नम्रतेचे घर विरळा जायें ||१|| निवाले मीपण ते जे ठायीं नाहीं सोहं शब्द सोई तेथें कैंची ||२||

रचनाकार: संत जनाबाई

संतमाहनुभाव येती दिंगबर । नम्रतेचें घर विरळा जाणें ॥१॥ निवाले मीपण तें जें ठायीं नाहीं । सोहं शब्द सोई तेथें कैंची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संतवचनें देव जोडे । सायुज्य मुक्ति पायां पडे । संतवचनें सांकडें । नुरेचि कांहीं ॥१॥ धन्य धन्य संतसंग । उभा तेथें श्रीरंग । लक्ष्मीसहित अभंग । तिष्ठे सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतवचने साधे मुक्ति । संतवचनें बह्मस्थिती । कर्माकर्माची शांती । संतवचनें ॥१॥ संतवचनें याग । संतवचनें सांग योग । संतवचनें अनुराग । घडतां संग संतांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥ मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटलें ॥१॥ बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रमक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतसंगतीने थोर लाभ झाला। मोह निरसला मायादिक ॥ १॥ घातले बाहेरा काम क्रोध वैरी । बैसला अंतरी पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत सेना

संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत ॥१॥ घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतसंगें हरे पाप । संतसंगे निरसे ताप । संतसंगे निर्विकल्प । होय मानस निश्चळ ॥१॥ संतसंगे वैराग्य घडे । संतंसगे विरक्ती जोडे । संतसंगे निजशांति वाढे । साधन ह्रदयीं अखंडित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतसमागम फळला रे मला । सन्मानाचा जाला लाभ मोठा ॥१॥ अतीथि आदर केला मुक्ताबाई । लांकडानें डोई फोडिली माझी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संतसमागमें सुखाची ते राशी । म्हणोनि पायांपाशीं सलगी केली ॥१॥ वंदूं चरणरज घालूं लोटांगण । अभय तें दान संत देती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ