भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतमहानुभाव येती दिगंबर नम्रतेचे घर विरळा जायें

santamahanubhav yeti digambar namrateche ghar virala jayen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
संतमहानुभाव येती दिगंबर नम्रतेचे घर विरळा जायें ||१|| निवाले मीपण ते जे ठायीं नाहीं सोहं शब्द सोई तेथें कैंची ||२|| पाहतां हा कोण दावितां हा कोण पाहातां दावितां हे खूण विरळा जाणें ॥३॥ नामयाची जनी निज वस्तु झाली। अवध्यासी बुडाली परब्रह्मीं ॥४॥