भजनी मालिका

भजने

संतांची विश्रांति ज्ञानियांचें गूज । मुक्तिचें हें बीज मोक्षदानीं ॥१॥ कृष्णा विष्णु हरी मुकुंद मुरारी । अच्युता नरहरी नारायण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥ संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥ म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येई वो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥ चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांचे घरीम जाहला पाहुणेर । नामाचा वोगर वाढि-यला ॥१॥ घ्यारे ताटभरी घ्यारे ताटभरी । जेवा पोटभरी रामनाम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संतांचे चरणतीर्थ घेतां । अनुदिनीं पातकांची धुणी सहज होय ॥१॥ संतांचें उच्छिष्ट प्रसाद लाधतां । ब्रह्माज्ञान हातां सहज होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥ संताचें देणें अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचे सुख जिहीं अनुबहविलें । ते जीवनमुक्त जहले जन्मोजन्मीं ॥१॥ संतांचा संग जयासी हो जाहला । प्रत्यक्ष घडला सत्यलोक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांच्या धीक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥ कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥१॥ भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धी पाय हरीदासांचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम