भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटलें

santasangatine jhale majhe kaj | antarin ten nij pragatalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटलें ॥१॥ बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रमक ॥२॥ दैन्य दरिद्र दुर गेलें । संतपाउले देखतां ॥३॥ एका जनार्दनीं सेवा । करीन मी आपुल्या भावा ॥४॥