भजनी मालिका

भजने

संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारी । भव दुःख हरी । संतनामें ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं द्यावय उपमा । ब्रह्मासुखधामा । पुढें नाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥ परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतां ऐसा उदार एक । त्रैलोक्यनायक श्रीविठ्ठल ॥१॥ आणखी नये तुळणें दुजा । धुंडितां समाजा त्रिभुवनीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संतांचा अनुभव संतची जाणति । येर ते हांसती अभाविक ॥१॥ नामाचा प्रताप प्रल्हादचि जाणें जन्म मरण जेणे खुंटविलें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

संतांचा तो संग नव्हे भलतेसा पालटावी दशा तात्काळिक ॥१॥ चंदनाचे संगें पालटती झाडें। दुर्बलांकडे देवमाथां ||२॥

रचनाकार: संत जनाबाई

संतांचा तो संग नव्हे मलतैसा । पालटावी दशा तात्काळिक ॥१॥ चंदनाचे संगें पालटती झाडें । दुर्बळ लांकडें देवामायां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या ॥१॥ त्याचिया योगें घडती सर्व । तीर्थ तें पवित्र होतीं तीर्थें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥ हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम