भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसंगतीने थोर लाभ झाला। मोह निरसला मायादिक

santasangatine thor labh jhala| moh nirasala mayadik

रचनाकार: संत सेना · अभंग
संतसंगतीने थोर लाभ झाला। मोह निरसला मायादिक ॥ १॥ घातले बाहेरा काम क्रोध वैरी । बैसला अंतरी पांडुरंगा ॥२॥ दुजियाचा वारा लागूं नेदी अंगा । ऐसे पांडुरंगा कळो आलें ॥ ३॥ संतांनीं सरता केला सेना न्हावी। ब्रह्मादिक पाही नातुडे जो ॥४॥