भजनी मालिका

भजने

संत पाहुणेरा सज्जनाचे घरीं । पूजा करितां वरी डोईं काढी ॥१॥ करितां सन्मान अंगीं भरे ताठा । देवा पैं करंटा असुनी काय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥१॥ संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संत सज्जन जिवलग माझे । त्यांचे चरण चुरीन वोजे ॥१॥ त्यांचे संगे सुख मना होय । आनंद आनंदी पाहतां होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत समागमें चाले दळभारू । आशा तृष्णा देश-धडी अहकारू ॥१॥ दुम दुम दुम दुम भेरी वाजे । आले अयो-ध्येसी श्रीरघुनाथ राजे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संत हे कोण तरी देवाचे हे डोळे । पूजेविण आंधळे देवाचिये ॥१॥ कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे । यासाठीं आवडे संत करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संत हे कोण तरी देवाचे हे डोळे। पूजेविण आंधळे देवाचिये ।।१।। कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे। यासाठी आवडे संत करी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

संतकृपा त्यांसीचि फळे । ज्यांचें चित्त वोळे परमार्थी ॥१॥ काय उणें सुखा मग । संतसंग जोडता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा