भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतरुपे तुम्हीच धरा । विश्वंभरा अवतार

santarupe tumhich dhara | vishvambhara avatar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतरुपे तुम्हीच धरा । विश्वंभरा अवतार ॥१॥ म्हणोनि महिमा कीर्ति जगीं । वागविती अंगी सामर्थ्य ॥२॥ बोलवउनि रेडा चालविता भिंती । विमानीं होती उपविष्ट ॥३॥ निळा म्हणे मानवी तनु । जाती घेऊनी वैकुंठा ॥४॥