भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसमागम फळला रे आला

santasamagam phalala re ala

संतसमागम फळला रे आला । सन्मानाचा जाला लाभ मोठा ॥१॥ अतीथि आदर केला मुक्ताबाई । लांकडानें डोई फोडिली माझी ॥२॥ देवाने गोंधळ घातला गरुडपारी । भिजली पितांबरी अश्रुपातीं ॥३॥ माझें माझें म्हणोनि गाईलें गान्हाणें । कळलें संतपण हेंचि तुमचें ॥४॥ भरी भरोनियां आलों तुम्हां जवळी । कैकाड मंडळी ठावी नोव्हे ॥५॥ नामा म्हणे सन्मान पावलों भरून । करितां गमन बरें दिसे ॥६॥