भजनी मालिका

भजने

संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥ बहु दुधड जरी जाली ह्मैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संताचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांची पुसणें ॥१॥ ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥ अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥ ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संताचिया माथां चरणांवरी माझा । देहीं भाव दुजा नाहीं नाहीं ॥१॥ नामांचे चिंतन करिती सर्व काळ । ते माझे केवळ मायबाप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संताचिये घरीं होईन श्वानयाती । उच्छिष्ट तें प्रीति मिळेल मज ॥१॥ तेणें या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ करीन काम ॥१॥ तेणें माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संताचिये पायीं मज पैं विश्रांती । नाहीं माया भ्रांति तये ठायीं ॥१॥ सांगतों तें मनीं धरावें वचन । संतांसी शरण जावें सुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांची आवडे तो देवाचाही देव । कळिकाळांचे भेव पायातळीं ॥१॥ आणिकाची चड नसेची वासना । संताचियां चरणा वाचूंनिया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥ विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती ॥१॥ तयाच्या विटाळा घ्यावें प्रायश्चित । आणिक दुजी मात नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे ॥१॥ देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ