भजनी मालिका
संत सेना

संत सेना

इन संत के भजन

अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा। तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥१॥ समर्थाचे बाळ समर्थचि जाणें। वागवी अभिमान म्हणतां त्याचे ॥२॥

रचनाकार: संत सेना

असतां वैकुंठासी। काय सांगें ऋषिकेशी। जाऊनि मृत्युलोकाशी। जन भक्तिसी लावीं कां ॥१॥ आज्ञा वंदुनीया शिरीं। जन्मलों न्हावीयाचे उदरीं । वाचे नाम निरंतरीं । रामकृष्ण गोविंद ॥२॥

रचनाकार: संत सेना

असाल तेथें नामाचे चिंतन। याहूनि साधन आणिक नाहीं ॥१॥ सोडवील माझा भक्ताचा कैवारी। प्रतिज्ञा निर्धार केला आम्ही ॥२॥

रचनाकार: संत सेना

आम्हां एकविध भाविकांची जाती । न जाणे निश्चिती दुजें कांहीं ॥१॥ खूण जाणे चित्तीं ्षोभ उपजेना । कळवळुनि स्तना लाव पाळी ॥२॥

रचनाकार: संत सेना