भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतमाहनुभाव येती दिंगबर । नम्रतेचें घर विरळा जाणें

santamahanubhav yeti dingabar | namratechen ghar virala janen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संतमाहनुभाव येती दिंगबर । नम्रतेचें घर विरळा जाणें ॥१॥ निवाले मीपण तें जें ठायीं नाहीं । सोहं शब्द सोई तेथें कैंची ॥२॥ पाहतां हा कोण दावितां हा कोण । पाहतां दावितां हे खूण विरळा जाणें ॥३॥ नामयाची जनी वस्तु झाली । अवध्यांसी बुडालि परब्रम्हीं ॥४॥