भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत

santasangen yacha vas sarvakal | sanchala sakal murtimant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत ॥१॥ घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥ आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥२॥ तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥३॥