भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती

santasamagam ekhadiya pari | rahaven tyache dvarin shvanayati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥ कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥ तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥