भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतवारें आलें वरी । चराचरीं धन्य तो

santavaren alen vari | characharin dhanya to

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतवारें आलें वरी । चराचरीं धन्य तो ॥१॥ संत सेवा घडली ज्यासी । प्रसन्न त्यासी देव सकळ ॥२॥ संत वचनीं विश्वासला । पूज्य तो झाला त्रिभुवनीं ॥३॥ निळा म्हणे संतभेटी । निरसन कोटी संदेहा ॥४॥