भजनी मालिका

भजन

ॐ कार स्वरुप सदगुरु असंग । अक्षय अभंग पांडुरंग ॥१॥ नसे ज्याचा ठायीं द्वैतद्वैत भाव । ब्रह्मा स्वयमेव पाडूरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥ रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐ कार हा वृक्ष विस्तारला । चतुःशाखें थोर जाहला । पुढें षडंतर शाखें विस्तारला । आठरांचा तया मोहोर आला ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐ कार हें मुळ सर्वांचे जाणावें । तेथुनी पहावें वेदशास्त्र ॥१॥ नमन करावें कुळदैवतांसी । मातापितरांसी सर्व भावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे ॥१॥ सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐ नमो शिवा आदि । कावडि घेतली खांदी मिळाली संतमांदी । त्याचे रज रेणु वंदी ॥ध्रु०॥ शिवनाम शीतळ मुखीं । सेविं पां कापडियारे दडदडदडदड दुडुदुडुदुडुदुडु । पळ सुटला कळिकाळा बापुडीयारे ॥१॥

ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥ हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐ नमोजी ब्रह्म अवतारू । शिश्य अभय करू । तो वंदिला श्रीगुरु । श्रीरामकृष्ण ॥१॥ म्हणतां वाचेसी श्रीराम । रस-नेसी न पडे श्रम । राम नाम उत्तमोत्तम । सर्व नामांमध्यें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुनी उपकार जीवा । अवतार धरिला ॥१॥ सोपा मंत्र रामनाम । तेणें झालें सर्व काम । साधनांचा श्रम । गोवा उगविअला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐ नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकांन कळे लाघवा । तुम्हीं स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितासां कवणाचें ॥१॥ ऐक रमणीय पार्वती त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति । पुराण वेद जया वानिती । तो श्रीपती ध्योतीं मी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐकरस्वरुपा सदगुरु समर्था । अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥ नमो मायाबापा गुरु कॄपाघना । तोडी या बंधना माया मोहा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया । तें पुंडलिक भुलवोनि आणिलें या ठायां ॥१॥ भुललें वो माय पुंडलिकांप्रीतीं । उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ