भजनी मालिका

भजने

संत आले वरले दिंडीं । हातीं खुरक्या काखेंत मुंडी ॥१॥ पंढरपुरीं पडली होड । मुटक्या परीस धांगडगोड ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत एकांतीं बैसजे । सर्वही सिध्दांत शोधिले । ज्ञानदृष्टी अवलोकिलें । सारांश काढिलें निवडुनी ॥१॥ तें एक श्रीहरींचे नाम । सकळ पातकां करी भस्म । अधिकारी उत्तम आणि अधम । चारी वर्ण नरनारी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संत गाती सनकादिक । तुमचिये कौतुक कीर्तिचें ॥१॥ तारिल्या शिळा गिळीला वन्ही । पर्वत उचलूनि धरिला वरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संत गाती हरीकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥ हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संत जाती हरिकीर्तनी । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ॥१॥ हेंचि भवसिंधुचें तारुं । तेणें उतरुं पैलपारु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत ती मंडळी महाद्वारां आली । मूर्ति देखियेली विटेवरी ॥१॥ चरणावरी माथां ठेविती भक्तजन । आनंदले लोचन पाहुनी भक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत ते कवन असंत ते कोण । सांगावी हे खूण दोही माजी । देवा तुजकारणें ऐसें झालें ॥१॥ पैल संत म्हणोनि जवळी गेलें । तेणें अमृत म्हणोनि विष पाजिलें । जीवासि घेतलें जालें तैसें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संत ते सोईरे सांगाती आमुचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥ जयाची आवडी धरी नारायण । म्हणोनि चरण धरूं त्याचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥ वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम