भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतमहिमा न वदतां वाचा । नोहे साचा उपरम

santamahima na vadatan vacha | nohe sacha uparam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतमहिमा न वदतां वाचा । नोहे साचा उपरम ॥१॥ वेदशास्त्रें देती ग्वाही । संतमहिमा न कळे कांहीं ॥२॥ पुराणासी वाड । श्रुति म्हणती न कळे कोड ॥३॥ योग याग वोवाळणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥