भजनी मालिका

भजने

व्यापक तो हरी पंढरीये राहिला । वेदंदिकां अबोला जयाचा तो ।१॥ सांवळें नागर कटीं ठेउनी कर । वैजयंती हार तुळशी गळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्यापक विठ्ठल नाम तेव्हाचि होईल । जेव्हा तें जाईल मीतूंपण ॥१॥ आपलें तें नाम जेव्हा वोळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं । चारी वर्ण बाणी विठू माझा ॥१॥ पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं । चारी वर्ण खाणी विठू माझा ॥१॥ शंख चक्र करीं वैजयंती माळा । नेसला पिवळा पितांबर ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

व्यापकारीस मन केलें वाड । सांपडलें गोड प्रेममुख ॥१॥ जिकडे पाहें तिकडे विठ्ठल अवघा । भीमा चंद्रभागा पुंडलिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्यापुनी जगीं तोचि उरला । तो विटेवरी देखिला गे माय ॥१॥ चतुर्भुज पीतंबरधारी । गलां शोभे वरी वैजयंती गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥ कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतित चिंतनी । येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ॥१॥ मिळोनि सर्वांची मेळ । गाती नाचती कल्लोळ । विठ्ठल स्नेहाळ । तयालागीं पहाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ