भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतित चिंतनी । येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना

vyas valmik narad muni | nitya chintit chintani | yeti pandharapurabhuvanin | shriviththal darushana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतित चिंतनी । येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ॥१॥ मिळोनि सर्वांची मेळ । गाती नाचती कल्लोळ । विठ्ठल स्नेहाळ । तयालागीं पहाती ॥२॥ करिती भीवरेचें स्नान । पुंडलिका अभिवंदन । एका जनार्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचें ॥३॥