भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यासादिका गाती ज्यासी । शुक सांगे परीक्षितीसी

vyasadika gati jyasi | shuk sange parikshitisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्यासादिका गाती ज्यासी । शुक सांगे परीक्षितीसी । श्रीकृष्ण उपदेशी उद्धवासी । नाम सार कलींत ॥१॥ तोचि वेध बैसला मना । ध्यानीं मनीं रामराणा । नाहीं दुजी उपासना । नामापरते साधन ॥२॥ वेदशास्त्र पुराणें । नामापरतें नाहीं घेणें । एका जनार्दनीं म्हणे । नाम उत्तम चांगलें ॥३॥