भजनी मालिका

भजने

शत वरुषांची घेउनी आला चिठ्ठी । अर्ध रात्रीं खादलें उठाउठीं ॥१॥ केव्हां जपसील रामनाम वाचें । आयुष्य सरलीया पडतील यमफांसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शतावती श्रवण अधिक पैं जालें । तेणें अंगा आलें जाणणेपण ॥१॥ पुराण श्रवण लौकिक प्रतिष्ठा । विचार चोहटा जाणिवेचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शब्द ज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्तते ॥१॥ जळो ते जाणींव जळो त्याचे बंड । जळो तया तोंड दुर्जनाचें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥ भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शब्दाचें ब्रम्हा लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥ ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥ ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

शब्दाचें सुख श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥१॥ स्पर्शाचें सुख त्वचेचेनि द्वारे । माझिया दातारें ऐसें केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शब्दामृत मांडे येती भोजना । अभ्यासी अज्ञाना तरी फळें ॥१॥ मुंगीचे थडके फुटे जों आकाश । ब्रह्मत्वेम सायास नये हातीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शब्दार्थे ब्रह्म लौकिकीं हो दिये। जैसे ते फांसे मर्यादांचें।।१।। ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहींचा आपण साक्षभूत ||२||

रचनाकार: संत जनाबाई

शम दम तप शौच आणि क्षमा । आर्जव तो प्रेमा ज्ञानालागीं ॥१॥ आत्मा अनुभव वेदीं सत्य भाव । ब्राह्मण स्वभाव कर्म ऐसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शरण आलें त्यासी नेदावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥ अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम