भजनी मालिका

भजने

वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अर्पीलें तें ॥१॥ नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥ येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खऱ्याखोट्यां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैराग्य अनुताप जाहलियावांचुन । रामनाम वदनीं न ये बापा ॥१॥ मुख्यत्वें कारण साधीं हें भजन । येणें समाधान होय बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैराग्य अभिमानें फिरविलें जातें । म्हणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥ संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैराग्य अभिमानें फिरविलें जातें म्हणवोनि यातें भाव खुंटा ।।१।। संचित मातृका वैरण घातली। अव्यक्ति दळिलीं व्यक्ताव्यक्त॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

वैराग्य प्रथम असावी शांती । तेणें विरक्ति अंगीं जोडे ॥१॥ हेंचि मुर्ख वर्म साधतां साधन । येणें जनार्दन जवळी असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैराग्याचा अंगीं झालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥ कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार । तोडियले कर आणेसाठीं ॥१॥ महाव्दारीं कथा श्रवण करितां । टाळी वाजवितां निघती नवे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वैष्णव तो एक इतर तीं सोंगें । ठसे देउनी अंगें चित्तारिती ॥१॥ जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैष्णव तो एक इतर तीं सोंगें। उसे देउनी अंगें चितारिती ॥१॥ जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

वैष्णव तो कबीर चोखामेला महार । तिजा तो चांभार रोहिदास ॥१॥ सजण कसाई बाया तो कसाब । वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वैष्णव तो कबीर चोखामेळा महार। तिजा तो चांभार रोहिदास ||१|| सजण कसाई बाया तो कसाब। वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ||२||

रचनाकार: संत जनाबाई