भजनी मालिका
संत चोखोबा

संत चोखोबा

या संतांची भजने

अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥ सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी । आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया ॥१॥ हाचि मानिला निर्धार । आतां न करी वाउगा विचार । वायां काय बा करकर । धरोनी धीर बैसलों ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥ विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगों ॥१॥ पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसां ॥१॥ अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी ॥१॥ कर दोन्ही कटी राहिलासे उभा । नीळवर्णप्रभा फांकतसें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी ॥१॥ पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस । समचरणी वास पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥ हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥ चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम । माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥ गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥ स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं । अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥ संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥ काय म्यां पामरें वानावें जाणावें । न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अहो पंढरीराया विनवितों तुज । अखंड संतरज लागो मज ॥१॥ नामाची आवडी उच्चार हा कंठी । करी कृपा दृष्टी मजवरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥ धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥ तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा