भजनी मालिका

भजने

वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥ प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वैष्णवा भुषण मुद्रांचें श्रृंगार । तुळशी परिकर वाहती कंठीं ॥१॥ तयांचियां पायीं माझा दंडवत । सदा जे जपत नाम मुखीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥ गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैष्णवाघरीं देव सुखावला । बाहिर नवजे दवडोनि घातिला ॥१॥ देव म्हणे माझें पुरतसें कोड । संगती गोड या वैष्णावांची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥ ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकीं ॥१॥ ऐशी वेदश्रुती बोलती पुराणें । नाही ती दुषणें हरीभक्तां ॥ ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैष्णवांनीं केली समाधि प्रदक्षिणा । गेले आचमना भोगावतीं ॥१॥ सारी रात्र कीर्तन केलें त्रयोदशीं । चतुर्दशी दिवशीं भोजनें केलीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥ किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वोखटें गोमटें असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥ न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वोडवोनि मान आला रायापाशीं । निर्भय मानसीं धर्मांगद ॥१॥ घेऊनियां शस्त्र स्मरला अच्युत । उभारिला हात मारावया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ