भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापका हा जनार्दन । जगाची भरला संपूर्ण

vyapaka ha janardan | jagachi bharala sampurna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्यापका हा जनार्दन । जगाची भरला संपूर्ण ॥१॥ मागें पुढें आहे उभा । काय वानुं त्याची शोभा ॥२॥ भरुनी उरला । सर्वांठायीं तो संचला ॥३॥ शरण एक जनार्दनीं । व्यापक तो जनीं वनीं ॥४॥