भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापक तो हरी पंढरीये राहिला । वेदंदिकां अबोला जयाचा तो

vyapak to hari pandhariye rahila | vedandikan abola jayacha to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्यापक तो हरी पंढरीये राहिला । वेदंदिकां अबोला जयाचा तो ।१॥ सांवळें नागर कटीं ठेउनी कर । वैजयंती हार तुळशी गळां ॥२॥ एका जनार्दनीं विश्वव्यापक । उभाचि सम्यक विटेवरी ॥३॥