भजनी मालिका

भजने

वोरसोनियां भक्तासाठीं । धांवे वैकुंठीहुनी उठाउठी । हात ठेऊनियां कटीं । उभा व्दारीं ठाकला ॥१॥ देखोनियां पुंडलिकासी । वास केला तयापाशीं । अवलोकूनियां निजभक्तांसी । परम विश्रांती पावला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वोसंडोनी हरि आनंदला तेथें । पुण्य हें अगणित सांगितलें ॥१॥ सर्वांगालागीं न्याहाळिलें परिपूर्ण । केलें निंबलोण आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्दारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥ श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वासतिचे मनीं राघोबाचा ॥१॥ ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं ठेवियेली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

व्यर्थ कां हव्यासीं करिसी परोपरी । नाम निरंतरीं न म्हणा कां रे ॥१॥ आयुष्य जाईल क्षणांत सरोन । पावसी पतन कुंभिपाकीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्यर्थ या व्युत्पत्ति लवितोसी श्रुति । विषयांची तृप्ति काय चाड ॥१॥ मायेचा हा फांसा मोहजाळ सोसा । वांयां कासा-विसा होसी झणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्याघ्रामुखीं सांपडतां गाय । तेथें धांवण्या कोण जाय ॥१॥ तैसा विषयभोग साचा । भोगितां सुखाचा सुख म्हणती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्याघ्रामुखीं सांपडे गाय । अद्वैतीं तूं रामनाम ध्याय ॥१॥ वाचे गांतां रामनाम । निवारेल क्रोधाकाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्यापक जनार्दनीं व्यापूनि राहिला । अखंड भरला ह्रुदयसंपुटीं ॥१॥ पाहतां पाहणें परतें गेलें दुरी । अवघा चराचरीं जनार्दन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्यापक तें नाम अनंत ब्रह्माडीं । मना सोंस सांडीं कल्पनेचा ॥१॥ कल्पनाविरहित नाम तूंचि गाये । सर्व पाहे विठ्ठला पायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्यापकं तें नाम तेव्हांच होईल । जेव्हां ओळखेल मीपणासी ॥१॥ आपुलेंचि नाम न ओळखिलें । व्यापक साधिलें जायेचिना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव