भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापकारीस मन केलें वाड । सांपडलें गोड प्रेममुख

vyapakaris man kelen vad | sampadalen god premamukh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
व्यापकारीस मन केलें वाड । सांपडलें गोड प्रेममुख ॥१॥ जिकडे पाहें तिकडे विठ्ठल अवघा । भीमा चंद्रभागा पुंडलिक ॥२॥ सर्व निरंतरीं सबाह्य अंतरीं । हें ब्रह्यांड पंढरी जाली मज ॥३॥ महुरलें तरुवर पुष्पीं फलीं भार । तेंचि निर्विकार सनकादिक ॥४॥ आवडीचा आनंदु तोचि विष्णुनादु । अनुभव तो गोविंदु गोपवेषें ॥५॥ नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा । मागें पुढें उभा सांभाळित ॥६॥