भजनी मालिका

भजने

व्रजात कोणे एक वेळेशी । आले गर्गाचार्य ऋषी । त्यासी दाखवितां कृष्नासी । चिन्हें बोलतां झाला ॥१॥ यशोदेबाई ऐक पुत्राची । लक्षणे ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

व्रत जे करिती तया जे निंदिती । त्याचे पूर्वज जाती नरकामधीं ॥१॥ भाळे भोळे भक्त वेडें वांकुडें गाती । तया जे हासती ते श्वानसम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्रत तप दान हवन पूजन । न लगे साधन नाम म्हणतां ॥१॥ रामकृष्ण हरी मुकुंड मुरारी । जिव्हे क्षणभरी न विसंबें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्रत तप न लगे करणें सर्वथा । न लगे तुह्मां तीर्था जाणे तया ॥१॥ आपुलेचि ठायीं असा सावधान । करा हरि-कीर्तन सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्रतबंधदीक्षा उपद्श गायत्री । ॐकार मूळमंत्री स्वर सोळा ॥१॥ केलें वेदपठण काव्य आणि व्याकरण । जालासे निपुण शास्त्रवक्ता ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

व्रतामाजीं व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय ॥१॥ अष्टही प्रहर हरिकथा करी । वाचें विठ्ठल हरी वदोनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्हावया भिकारी हेंचि आम्हां कारण । अंतरोनि जन व्हावें दुरी ॥१॥ संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

शंकर – खंडोबा – भैरव नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ।। शिरी जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ।।

रचनाकार: संत रामदास

शक्ति आहे तों करावें विश्व कीर्तनें भरावें पुण्यवंत तो साक्षेपी। आळशी लोकीं महापापी आपुलाचि घात करी ।

रचनाकार: संत रामदास

शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें । ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें रे विठ्ठल ॥१॥ टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग । पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग रे विठ्ठल ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

शंख चक्र पद्म विराजत करी । बाप तो श्रीहरीं उभा वटी ॥१॥ रुक्मिणी सत्यभामा शोबतसे राही । गरुड हनुमंत दोघे दों ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ