भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठें पां

vyapuniyan bharala dev | rita thav kothen pan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठें पां ॥१॥ तयाचें करा रे चिंतन । मग तुम्हां न पडे न्यून ॥२॥ वाचे वदा विठ्ठल साचा । सोइरा साचा अंतकाळी ॥३॥ मागें पुढें उभा असे । एका जनार्दनीं दिसे ॥४॥