भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापक विठ्ठल नाम तेव्हाचि होईल । जेव्हा तें जाईल मीतूंपण

vyapak viththal nam tevhachi hoil | jevha ten jail mitumpan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्यापक विठ्ठल नाम तेव्हाचि होईल । जेव्हा तें जाईल मीतूंपण ॥१॥ आपलें तें नाम जेव्हा वोळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणें ॥२॥ आपले ओळखी आपणचि सांपडे । सर्वत्राही जोडे विठ्ठलनाम ॥३॥ नामविण जन पशुच्या समान । एका जनार्दनीं जाण नाम जप ॥४॥