भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

संत जाती हरिकीर्तनी । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ॥१॥ हेंचि भवसिंधुचें तारुं । तेणें उतरुं पैलपारु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत ती मंडळी महाद्वारां आली । मूर्ति देखियेली विटेवरी ॥१॥ चरणावरी माथां ठेविती भक्तजन । आनंदले लोचन पाहुनी भक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत ते सोईरे सांगाती आमुचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥ जयाची आवडी धरी नारायण । म्हणोनि चरण धरूं त्याचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संत सज्जन जिवलग माझे । त्यांचे चरण चुरीन वोजे ॥१॥ त्यांचे संगे सुख मना होय । आनंद आनंदी पाहतां होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतचरणरज वंदुनीं तत्त्वतां । सायुज्य भक्ति माथां पाय देऊं ॥१॥ थोरीव थोरीव संतांची थोरीव । आणिक वैभव कांही नेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतजनाची मिळाली मिळणी । रामनामाची भरली भरणी ॥१॥ रामनाम सेवा हा राम सांठवा । परमानंदाचा लाभ जाला जीवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ