भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतचरणींचा महिमा । कांहीं न कळें आगमां निगमां

santacharanincha mahima | kanhin na kalen agaman nigaman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतचरणींचा महिमा । कांहीं न कळें आगमां निगमां ॥१॥ ब्रह्मा घाले लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥२॥ शिव ध्यातो पायवणी । धन्य धन्य संतजनीं ॥३॥ तया संतांचा सांगात । एका जनार्दन निवांत ॥४॥