भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत ते सोईरे सांगाती आमुचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं

sant te soire sangati amuche | tenen kalikalachen bhay nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत ते सोईरे सांगाती आमुचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥ जयाची आवडी धरी नारायण । म्हणोनि चरण धरूं त्याचें ॥२॥ परलोकीचे सखे सोइरे सांगाती । मज ते आदीअंती सांभाळिती ॥३॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होईन त्यांचा दास जन्मोजन्मीं ॥४॥