भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतचरणीं जीवभाव । ठेविला देह विसर

santacharanin jivabhav | thevila deh visar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतचरणीं जीवभाव । ठेविला देह विसर ॥१॥ आतां तुम्हीं उपेक्षिल्यावरी । कोण वानील तुमची थोरी ॥२॥ बहु जाहलों कासावीस धरली कास आदरें ॥३॥ एका जनार्दनीं परता । करितां लाज येई माथां ॥४॥