भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत मायबाप म्हणतां । लाज वाटे बहु चित्ता

sant mayabap mhanatan | laj vate bahu chitta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत मायबाप म्हणतां । लाज वाटे बहु चित्ता ॥१॥ मायबाप जन्म देती । संत चुकविती जन्मपंक्तीं ॥२॥ मायबापापरीस थोर । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥३॥ शरण एका जनार्दनीं । संत शोभती मुगुटमणी ॥४॥