हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी
hrudayastha asoni kan re phirasi vayan | dip ani chhaya jayapari
हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी ॥१॥ आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजें नाहीं ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
hrudayastha asoni kan re phirasi vayan | dip ani chhaya jayapari
हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी ॥१॥ आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजें नाहीं ॥२॥
hrudayastha jaya nahin thava dev | puja karati vav sarvabhaven
हृदयस्थ जया नाहीं ठावा देव । पूजा करती वाव सर्वभावें ॥१॥ जाणावा अंतरीं मानावा हृदयीं । पहावा सर्वांतरीं परमात्मा ॥२॥
hrudayin nanden sandeh mul | tethen phal virudhen kenvi
हृदयीं नांदें संदेह मूळ । तेथें फळ विरुढें केंवी ॥१॥ जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥
hrudayin paramatma nande paripurna | to shiv sanatan purnabrahma
हृदयीं परमात्मा नांदे परिपुर्ण । तो शिव सनातन पूर्णब्रह्मा ॥१॥ जीव तो गुंतला विषयाचे लक्षीं । शिव सर्वसाक्षीं परब्रह्मा ॥२॥
hrudayin sada nam jape ram | taya badhi na krodh kam
हृदयीं सदा नाम जपे राम । तया बाधी ना क्रोध काम ॥१॥ हें तो आलें अनुभवां । जीवां सर्वा कलियुगीं ॥२॥
hrudayinch snan hrudayinch dhyan | hrudayinch bhajan sarvakal
हृदयींच स्नान हृदयींच ध्यान । हृदयींच भजन सर्वकाळ ॥१॥ हृदयींच दान हृदयींच धर्म । ह्रुदयींच नेम सर्व जोडे ॥२॥
hrudayinche dev hrudayinch bhakta | hrudayinch hot puja sarva
हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥ ह्रुदयींच ध्यान हृदयीं जें मन । हृदयीं तें आसन देव वसे ॥२॥
hen ton avaghen phajitichen bhand | antakalin tond kalen karati
हें तों अवघें फजितीचें भांड । अंतकाळीं तोंड काळें करती ॥१॥ चालता इंदियें म्हणती माझें माझें । अंतकाळीचें वोझें न घेती हे ॥२॥
hen sharir nashivant sachen | jayachen ho jayachen antakalin
हें शरीर नाशिवंत साचें । जायाचें हो जायाचें अंतकाळीं ॥१॥ काय याचें सुख मानिती हे जन । पडिलेसें जाण मायाचक्री ॥२॥
hen sahajavi thoravale | pruthvi ap tej jhalen | vayu akash sanchalen | anandale sakalahi
हें सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥ तें माहेरी येवढें चक्र । गगनीं हा निर्धार । याचा पाहे पां विचार । चैतन्यामाजीं ॥२॥
henchi ek kharen | sada vache nam smare
हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥ धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥
henchi kalimajin sadhan | avadi kirtan harichen
हेंचि कलीमाजीं साधन । आवडी कीर्तन हरीचें ॥१॥ न घडे योगयागतप । होय अनुताप कीर्तनीं ॥२॥
hechi devasi vinanti | santaseva divasaratin
हेचि देवासी विनंती । संतसेवा दिवसरातीं ॥१॥ वास देई पंढरीचा । नामघोष कीर्तनाचा ॥२॥
henchi vedokti nijasar | atma avinash sachar
हेंचि वेदोक्ति निजसार । आत्मा अविनाश साचार ॥१॥ नाहीं जन्ममरणाचा धाक । बोले शुद्ध बुद्ध ऐसा वेद ॥२॥
henchi sachen ba sadhan | mukhin nam hrudayin dhyan
हेंचि साचें बा साधन । मुखीं नाम हृदयीं ध्यान ॥१॥ येणे तुटे नाना कंद । पीडा रोग भवछंद ॥२॥
henchi majhi maninchi as | kara das sevesi
हेंची माझी मणींची आस । करा दास सेवेसी ॥१॥ नका कांही गुंतांगुतीं । लिगाड फजिती मज मांगें ॥२॥
hemavantachya potin ek janmali gorati | taye tya dhurjati variyalen
हेमवंताच्या पोटीं एक जन्मली गोरटी । तये त्या धूर्जटी वरियलें ॥१॥ मंडपाच्या द्वारीं आला जंव नोवरा । अवगुणाचा म्हातारा रुप नाहीं ॥२॥
ho bhalo tum nandan lalachhe | muje ganvadhi batavachhe
हो भलो तुम नंदन लालछे । मुजे गांवढी बतावछे ॥१॥ आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ॥२॥
hoi sharanagat bhaki re karuna | tarich bandhana chukashil
होई शरणागत भाकी रे करुणा । तरीच बंधना चुकशील ॥१॥ आपुलें तूं हित करूनियां घेई । सदा वाचे गाई रामनाम ॥२॥
hoin mi das kamari santacha | sankalpa ha sacha jivabhaven
होईन मी दास कामारी संताचा । संकल्प हा साचा जीवभावें ॥१॥ घालीन लोटांगण करीन पुजन । भावें वोवाळीन प्राण माझा ॥२॥