भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम

sant te soyare jivalag sangati | bhetatan purati sarva kam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥२॥ देऊं परिसाची यासी उपमा । परी ते अये समा संताचिये ॥३॥ एका जनार्दनीं संतांचा सांगात । पुरती सर्व आर्त जीवींचें जें ॥४॥