भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत ते देव देव ते संत । ऐसा हेत दोघांचा

sant te dev dev te sant | aisa het doghancha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत ते देव देव ते संत । ऐसा हेत दोघांचा ॥१॥ देव ते संत संत ते देव । हाचि भाव दोघांचा ॥२॥ संतांविण देवा कोण । संत ते जाण देवासी ॥३॥ फळपुष्प एका पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ॥४॥