भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतजनाची मिळाली मिळणी । रामनामाची भरली भरणी

santajanachi milali milani | ramanamachi bharali bharani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतजनाची मिळाली मिळणी । रामनामाची भरली भरणी ॥१॥ रामनाम सेवा हा राम सांठवा । परमानंदाचा लाभ जाला जीवा ॥२॥ कीर्तनाचे तारुं लाधलं । रामनाम केणें सवंगले ॥३॥ एका जनार्दनीं रामनामसेवा । परमानंदाचा लाभ जाला जीवा ॥४॥