भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत ती मंडळी महाद्वारां आली । मूर्ति देखियेली विटेवरी

sant ti mandali mahadvaran ali | murti dekhiyeli vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत ती मंडळी महाद्वारां आली । मूर्ति देखियेली विटेवरी ॥१॥ चरणावरी माथां ठेविती भक्तजन । आनंदले लोचन पाहुनी भक्त ॥२॥ महाद्वारी नामा कीर्तनीं उभा ठेला । मिळालासे मेळा सकळ संत ॥३॥ सद्रदित कंठ कीर्तन करतां । एका जनार्दनीं सर्वथा भक्त होती ॥४॥