भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत दयाळ दयाळ । अंतरीं होताती प्रेमळ

sant dayal dayal | antarin hotati premal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत दयाळ दयाळ । अंतरीं होताती प्रेमळ ॥१॥ शरण आलियासी पाठीं । पहाताती कृपादृष्टी ॥२॥ देउनियां रसायना । तारिताती भवार्णव जाणा ॥३॥ संतांसी शरण जावें । एका जनार्दनीं त्यांसी गावें ॥४॥