भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतचरणीं आलिंगन । ब्रह्माज्ञानी होती पावन

santacharanin alingan | brahmadnyani hoti pavan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतचरणीं आलिंगन । ब्रह्माज्ञानी होती पावन ॥१॥ इतर सहज उद्धरती । वाचे गातां ज्यांची कीर्ति ॥२॥ लाभे लाभ संतचरणीं । मोक्षसुख वंदी पायवणीं ॥३॥ शरण एका जनार्दनीं । उदार संत त्रिभुवनीं ॥४॥