भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

होउनी भक्तांचा अंकिला । पुरवितसे मनोरथ । ऐसी हे प्रचीत । उघड पहा ॥१॥ देव भक्ताचा अंकिला । धांवे आपण वहिला । भक्ताचिया बोला । उणें पडों नेदी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होऊनि सावधान चित्ता । उपमन्यूची कथा । एका भावें ऐकतां । सायुज्यता पाविजे ॥१॥ उपमन्यु मागितलें । देवें तयासी दिधलें । तें सांगेन वहिलें । चित्त देऊनी परियेसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होणार जणार न चुके कल्पांतीं वाउगी । कुंथाकुंथी करुनी काय ॥१॥ लिहिलें संचितें न चुके कल्पांतीं । वाउगाचि भ्रांतीं फळ काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी जाला हरी ॥१॥ बळीच्या तो द्वारी सारथीं पर्थाचा । गोसावी आमुचा वेदवाणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ