भजनी मालिका

भजने

वाल्मिकादि भीष्म द्रोण कृपाचार्य । द्रुपदतनया दिली भेटी ॥१॥ उद्धव नारदा अंबरिष शुक । बळी धरुवादिक आले भेटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाळवंटीं उभा करें कुरवाळिल । जीवींचें पुसेल जड-भारी ॥१॥ हरुषें लोळणी घालूं महाद्वारीं । येईल समोरी केशिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाळिलें जे पंढरिनाथें । त्याचें कोण कार्य येथें ॥१॥ घाला आपणा बाहेरीं । नका सांगों त्याची थोरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥ आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥ सांडूनि लौकिक झालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परि लक्ष तेथें ॥१॥ दुडी वरी दुडी पाण्या निघाली गुजरी । चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥ ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वासनेचा त्याग करारे सर्वथा । या भावें अनंता शरण जावें ॥१॥ कृपेचा सागर नुपेक्षी निर्वाणीं । कलिकाळाहूनि सोडविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासनेचा फांसा पडिला माझें कंठीं । हिंडलों जगजेठी नाना योनी ॥१॥ सोडवीं गा देवा दीनदयानिधी । मी एक अपराधी दास तुझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासनेची करणी ऐकें तूं मना । या केली रचना ब्रह्मांडाची ॥१॥ निर्गुण चैतन्य सदा सुखरासी । त्या दिल्ही चौ-र्‍यांशीं लक्ष सोंगें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासनेंचे वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवेंक तयावरी तोडी ॥१॥ यापरी जाणोनी संन्यासु घेई । गुरुवचनें सुखें विचरतु जाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥ या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वासरूं भोवे खुंटियाभोवतें । आपआपणियातें गोवियेलें ॥१॥ तैसी परी मज जाली गा देवा । गुंफलोंसे भावा लटिकिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वासुदेव टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥१॥ रामकृष्ण वासुदेवा। जाणवितो सकल जिवा। द्या मज दान वासुदेवा। मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥२॥

रचनाकार: संत सेना