भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासनेचा फांसा पडिला माझें कंठीं । हिंडलों जगजेठी नाना योनी

vasanecha phansa padila majhen kanthin | hindalon jagajethi nana yoni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वासनेचा फांसा पडिला माझें कंठीं । हिंडलों जगजेठी नाना योनी ॥१॥ सोडवीं गा देवा दीनदयानिधी । मी एक अपराधी दास तुझा ॥२॥ शरण आलियाचे न पाहसी अवगुण । कृपेचें लक्षण तुज साजे ॥३॥ त्रिभुवनीं समर्थ उदार मनाचा । कृपाळू दीनांचा ब्रीद तुझें ॥४॥ गजेंद्र गणिकेची राखिलीं तुंवां लाज । उद्धरिला द्विज अजामेळ ॥५॥ नामा म्हणे देवा अव्हेरितां मज । जगीं थोर लाज येईल तूंतें ॥६॥