भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाळिलें जे पंढरिनाथें । त्याचें कोण कार्य येथें

valilen je pandharinathen | tyachen kon karya yethen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वाळिलें जे पंढरिनाथें । त्याचें कोण कार्य येथें ॥१॥ घाला आपणा बाहेरीं । नका सांगों त्याची थोरी ॥२॥ आगम पहिला वेदांत । चित्त विषयापें सतत ॥३॥ धनें मानें केलें वेडें । सुख नेणती ते बापुडे ॥४॥ मान इच्छा चाड जीवीं । काय करुं ते गोसावी ॥५॥ जाती म्हणोनी आनाठाया । निळा दुर पासुनी तयां ॥६॥