भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासना उडाली तृष्णा मावळली

vasana udali trushna mavalali

रचनाकार: संत बंका · अभंग
वासना उडाली तृष्णा मावळली । कल्पना गळाली अहंकृती ॥१॥ तोचि भक्त जाणा दया शांति वसे । काम क्रोध फांसे न बाधी त्या ॥२॥ मोह ममतेचे तोडोनियां जाळें । केलें निजबळें तृणप्राय ॥३॥ वंका म्हणे तोची प्राणाचाही प्राण । आणीक प्रमाण नाही मज ॥४॥