भजनी मालिका

भजने

विठठनामीं आळस न करी गव्हरा । वायांचि वेरझारा शिणतोसी ॥१॥ हरी उच्चारण करी हा विचार । नामचि साचार उद्धरण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठठल पुडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं । कर ठेवुनियां कटीं । भक्तासाठीं अद्याप ॥१॥ न कळे तयांचे महिमान । वेदां पडलेसें मौन । शास्त्रांचे भांडण । परस्परें खुटले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥ परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठठलाचें नाम जे माऊलिचे ओठीं । विठो तिचें पोटीं गर्भवासी ॥१॥ जयाचिये कुळीं पंढरीची वारी । विठो त्याचे घरीं बाळलीळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठठलासी पाहे विठठलासी ध्याये । विठ्ठलासी गाये सर्वकाळ ॥१॥ विठठल हा वृत्ति विठठल जपणें । चित्त वित्त मनें सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठा नामायाचा आला पंढरपुरा । भेटला सोयरा विटेवरी ॥१॥ सुखदु:ख अवघें सांगितलें श्रीहरी । धरणें तुझे द्वारीं घेईन देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विठाबाई नामी नसता प्रेमसंग काय भजनी रंग नाचोनीया ॥१॥ भाव नसता राग ताल स्वर जाण । संस्कार नसता प्रेत समजा पूर्ण ||२||

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे अधर्म तो धर्म जेणे नारायण वश्य होय ||१|| दुःख केले तरी न होतो जीवंत भवरोगाचे वैद्य येथे आहे।।२।।

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे देहभाव गेले चरण देखीले जेव्हा राजाराम ॥१॥ उठवीती मजसी हस्त दोनी धरुनी। स्वामीपासी न्हेती मजसी जाण ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे धान्याबरोबर घाटचारा जाण येतो समजा ।। १॥ तैसे घाटीचारा सिटा समजा जाण नाम धान्य मुख्य समजा पूर्ण ||२||

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे शके सांगते ऐका सोळाशते ऐसी जाणावा तो ॥१॥ बहुधान्यनाम सवत्छर जाणा अवतार पूर्णब्रह्म जाणा ||२||

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे स्मरण आले जैसे जनाबाई म्हणुनी सर्व माझे ॥ १॥ जनी असती माझे पाठी उभा राहसी जगजेती ।।१।।

रचनाकार: संत विठाबाई